होळी हा रंगांचा आणि प्रेमाचा उत्सव आहे. हिवाळा संपला कि वसंत ऋतूच्या आगमनाने फाल्गुन पौर्णिमेला हा सण येतो . होळीच्या दिवशी रात्री होळीची पूजा करून ती पेटविली जाते आणि सगळ्या वाईट गोष्टींचा अंत त्या आगीत होऊ दे असे म्हटले जाते . दुसऱ्या दिवशी सकाळी ती जळालेली राख लावून धुळवड खेळतात. धुळवड म्हणजे धूलिवंदन. धूलिवंदन साजरा करण्याच्या विविध पद्धती आहेत महाराष्ट्रात होळी नंतर पाचव्या दिवशी म्हणजे रंगपंचमीला रंग खेळण्याची पध्द्त आहे पण आता कॉस्मोपॉलिटिअन संस्कृती मूळे बहुतेक ठिकाणी धुलिवंदनलाच रंग खेळतात.
चला तर मग पाहूया कोणत्या राज्यात कशी होळी साजरी केली जाते
१. बरसाणा
मधुरेपासून ४२ कि.मी अंतरावर हे गाव आहे जे राधेचे जन्मस्थान आहे. तेथूनच जवळ नंदगाव आहे जे कृष्णाचे जन्मस्थान आहे. नंदगावची सगळी पुरुष मंडळी बरसाणाला होळी खेळण्यासाठी येते आणि राधिकेच्या देऊळावर झेंडे फडकवितात. इथे होळी खेळण्याची एक प्राचीन परंपरा रूढ आहे . नंदगावच्या पुरुष मंडळींचे स्वागत इथे रंगांनी नाही होत तर काठीने होते. बरसाणाच्या गोपिका ह्या पुरुष्याना काठीने मारण्याचा प्रयत्न करतात पुरुश्यांना इथे स्वतःहाला वाचवावे लागते. जर पुरुष स्वतःला वाचवू शकले नाहीत तर दुसऱ्या दिवशी त्यांना स्त्रियांचे कपडे घालून नृत्य करावे लागते. असे म्हणतात, कि कृष्णही गोपिकेंच्या ह्या खेळापासून स्वतःलाही वाचवू शकला नाही. दुसऱ्या दिवशी बरसाणाचे पुरुष आणि नंदगावच्या स्त्रिया हा खेळ खेळतात. ह्या प्रकाराला ‘लठमार होळी’ म्हणतात.
२. ब्रिज, मथुरा, वृंदावन
मथुरेत १-२ दिवस नाही तर तब्बल आठवडाभर वेगवेगळ्या कृष्ण मंदिरात होळी खेळली जाते. सगळ्यात सुंदर आणि प्रसिद्ध अशी होळी बांके-बिहारी ह्या कृष्ण मंदिरात होते. येथे मोठ्या संख्येने लोक येतात रंग खेळतात, नाचतात, गाणी म्हणतात आणि कृष्णरसात तल्लीन होऊन जातात. मथुरेत गुलाल- कुंड लेक येथे हि मोठ्या संख्येने गर्दी होते. भांग तयार केली जाते, गोडाचे पदार्थ, नाच, गाणी मोठ्या जल्लोषात होळी साजरी केली जाते. कृष्ण-लीलेची नाटकं हि सादर केली जातात.
३. बंगाल
बंगाल मध्ये ‘बसंत उत्सव’ हा रवींद्रनाथ टागोर यांनी सुरु केला. वसंत ऋतूचे स्वागत रंगाने, गाण्याने आणि नृत्याने होते. शांतिनिकेतन च्या शांत वातावरणात पूजा, पाठ आणि जप केले जातात. होळी येथे ‘डोल पौर्णिमा’ , ”डोल जत्रा’ म्हटले जाते
४. गोवा
गोव्यात होळीला ‘शिगमो’ म्हणतात शिगमोत्सव इथे भडक गुलाल आणि नील ने साजरा करतात. होळीचे प्रमुख आकर्षण म्हणजे सगळे लोक एकत्र येऊन रॅली काढतात, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतात . ‘पानाजी शिगमोत्सव समिती ‘, पणजी हि प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात होळी चे आयोजन करते.
५. मणिपूर
पूर्व भागातील मणिपूर येथे होळीला ‘यॊसंग’ ‘yaosang’ असे म्हणतात ६ दिवस होळी खेळली जाते. लहान मुले प्रत्येक घरी जाऊन होळीसाठी वर्गणी गोळा करतात. दुसऱ्या दिवशी गोविन्दगी मंदिरात संकीर्तन सादर केले जाते.तिसऱ्या दिवशी मुली त्यांच्या वर्गणीसाठी नातेवाईकांकडे जातात. चवथ्या आणि पाचव्या दिवशी पाण्यात रंग मिसळून होळी खेळतात. होळीच्या दिवशी पांढरे कपडे आणि पिवळा फेटा घालून लोक देवळात जातात आणि गुलाल खेळतात. शेवटच्या दिवशी इंफाळ येथे कृष्ण मंदिरात मिरवणूक निघते आणि सगळीकडे रंग उडविला जातो. विविध प्रकारच्या सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन केले जाते. ‘ thabal chongba’ किंवा the moonlight dance ह्या त्यांच्या पारंपरिक नृत्याचे सादरीकरण केले जाते.
६. पंजाब
‘ होला मोहल्ला ‘ हि पंजाबातील वार्षिक जत्रा शिखांचे धर्मगुरु, गुरु गोबिंद सिंग यांनी होळी साजरी करण्यासाठी सुरु केली. पंजाबमधील आनंदपूर साहिब येथील होळी तर खऱ्या शिखाने आवर्जून पाहावी असे म्हणतात . इथे रंग खेळण्यापेक्षा शक्तिप्रदर्शनाचे महत्व जास्त आहे.कुस्ती, तलवारबाजी, कराटे, फेटा बांधणे अशा विविध खेळांचे आयोजन केले जाते. त्याचबरोबर निरनिराळे खाद्यपदार्थ केले जातात मालपुवा, गुजिया,लाडू. उत्साहपूर्ण वातावरण असते ढोल आणि ड्रमच्या तालावर नाच गाणी होतात.
७. तामिलनाडू
तामिळनाडू मध्ये होळी ला ‘कामाविलास’ असे म्हणतात म्हणजे प्रेमाची देवता. येथे होळी हा प्रेमाचा उत्सव मानला जातो त्या दिवशी गाणी गायली जातात.