मिल्कपावडर बर्फी अतिशय सोपी, कमी साहित्यात आणि झटपट तयार होते. मिठाईवाल्याकडे मिळणाऱ्या मिल्क पेढ्यासारखी चव लागते. बेस तोच ठेऊन आपल्या आवडीप्रमाणे त्यात वेगवेगळे इसेन्स आणि फूड कलर टाकून बदल करता येतो. ही बर्फी करून पाहा कशी झाली आम्हाला नक्की कळवा, फोटो शेअर करा. शुभ दीपावली!
साहित्य
१६ बर्फी साठी
२ १/२ कप मिल्क पावडर
३/४ कप दूध
१/४ कप तूप
१/२ कप साखर
वेलची पूड १/२ चमचा
सुकामेवा आवडीनुसार.
कृती
एका मोठ्या कढईमध्ये तूप आणि दूध गरम करण्यासाठी ठेवा.
दूध कोमट असतानाच मिल्क पावडर मिक्स करा. मिश्रण सतत ढवळत रहा नाहीतर गुठळ्या होतील.
आता साखर आणि वेलची पावडर मिसळा.
गॅस बारीक करून दूध आटेपर्यंत मिश्रण हालवत राहा. थोड्यावेळानंतर मिश्रण घट्ट होऊन तूप सुटेल.
एका थाळीला तूप लावून मिश्रण जाडसर पसरवून घ्या. वरतून कापलेले सुकामेवा पेरून घ्या.
गार झाले कि वड्या कापून सर्व्ह करा