बालूशाही हा गोड पदार्थ भारतातल्या विविध प्रांतात वेगवेगळ्या नावाने प्रसिद्ध आहे. भारताबाहेर बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळमध्येही बालूशाही केली जाते. वरतून खुसखुशीत आणि आतून मऊ असा हा पदार्थ चवीला डोनट्स सारखा लागतो, बालूशाही आणि डोनट्ससाठीचे साहित्य एकच आहे फक्त कृती थोडी वेगळी आहे. नावाप्रमाणेच हा शाही पदार्थ अस्सल तुपात तळला जातो आणि वरतून भरपूर सुकामेवा आणि चांदीचा वर्ख लावला जातो.
साहित्य
२० बालूशाहीसाठी
२ १/२ कप मैदा
१ टीस्पून बेकिंग सोडा
७ चमचे पातळ तूप
पाऊण वाटी दही
पाकासाठी
२ वाट्या साखर
१ वाटी पाणी
१/२ चमचा वेलची पूड
सजावटीसाठी बदामाचे काप
कृती
१. प्रथम मैदा, सोडा, तूप, आणि दही मिक्स करून मैदा मळून घ्यावा. आवश्यकतेनुसार कोमट पाणी घालावे. ३० मिनिटे पीठ मुरण्यासाठी ठेवून द्यावे.
२. तोपर्यंत पाक तयार करून घ्यावा. साखर, पाणी, वेलची पूड एकत्र करून पाच मिनिटं उकळून घ्यावे.
३. मळलेल्या पिठाचे साधारण मोठ्य्या लिंबाएवढे गोळे करून त्याला वरतून अंगठ्य्याने मध्यभागी प्रेस करून आकार द्यावा. अश्याप्रकारे सर्व पिठाचे गोळे करून घ्यावे.
४. कढईमधे तूप गरम करून ४-५ गोळे एकदाच गोल्डन ब्राऊन तळून घ्यावे.
५. तळलेले गोळे थोडेसे कोमट झाले कि पाकात टाकावे.
६. २-३ तास पाक चांगला मुरतो.
७. पाक मुरल्यानंतर गोळे पाकातून बाहेर काढून बदामाचे काप आणि चांदीचा वर्ख लाऊन सर्व्ह करा.