साहित्य-
४ पिकलेले पेरू
१ वाटी कंडेन्सड मिल्क
१ वाटी क्रीम चीझ
२ चमचा फ़्रेश क्रीम
१/४ चमचा मीठ
१/२ चमचा मिरपूड
१/२ चमचा लाल मिरची पावडर
कृती-
प्रथम पेरूच्या देठांचा काळा भाग चाकूने काढून घ्या आणि खुर चमच्याने पेरूच्या आतला सगळा गर बाहेर काढा. हा गर काढताना पेरूचे तुकडे किंवा पेरू कापू नका कारण पेरूच्या आतमध्ये आपल्याला आईस्क्रीम सेट करण्यासाठी ठेवायचे आहे. पेरू संबंध तसाच दिसायला हवा फ़क्त आतून पोकळ करून घ्या. अश्याप्रकारे चारही पेरुंचा गर काढून घ्या. आणि कोरलेले पेरू फ्रिजमध्ये ठेऊन द्या.
आता हा गर मिक्समध्ये बारीक करून ज्युसच्या गाळणीने गाळून बिया काढून टाका.
आता पेरूचा गर, क्रीम चीझ, कंडेन्सड मिल्क, फ्रेश क्रीम, मिरपूड, मीठ आणि लाल मिरची पावडर सगळे एकत्र करून मिक्सरमध्ये फिरवून घ्या.
गोड आणि आंबट चवीसाठी कंडेन्सड मिल्क आणि क्रीम चीझचे प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता.
आईस्क्रीमचा बेस तयार आहे आता हे मिश्रण एका हवाबंद डब्यात टाकून ४ तासांसाठी फ्रीजरमध्ये सेट करण्यासाठी ठेऊन द्या.
४ तासानंतर सेट झालेले आईस्क्रीम परत एकदा मिक्सर मधून काढून घ्या आणि कोरलेल्या पेरूच्या आतमध्ये भरून फ्रिजरमध्ये ६ तासांसाठी सेट करण्यासाठी ठेवा.
सेट झाल्यानंतर वरतून मिरपूड, लाल मिरची पावडर टाकून सर्व्ह करा.
क्रीम चीझ नसेल तर साधे चीझ आणि थोडं घट्ट दही एकत्र करून घेऊ शकता.