कोरफड हि अत्यंत गुणकारी अशी औषधी वनस्पती आहे. कोरफडीचा रस त्वचेवर लावल्यास त्याचे भरपूर फायदे दिसून येतात, त्याचबरोबर हा रस केसांच्या अनेक समस्यांवरहि मात करतो. आता तुम्ही म्हणाल आम्ही तर कोरफडीच्या रसाचे सौंदर्यप्रसाधने, साबणे आणि शाम्पू वापरतो त्यासाठी कोरफड घरात लावण्याची काय गरज आहे. पण नैसर्गिक रसाचे फायदे अधिक असतात. अशी हि फायदेही कोरफड आपण आपल्या घरात, बाल्कनीत किंवा अगदी कोठेही सहजपणे लावू शकतो शिवाय ह्याच्या वाढीसाठी पाणीहि कमी लागते.
१. भरपूर जीवनसत्वे आणि खनिजांचा साठा
कोरफडीच्या रसामध्ये जीवनसत्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात. ह्या रसाचा वापर तुम्ही सकाळी energy drink म्हणून करू शकता. त्याचप्रमाणे एक ग्लास कोरफडीच्या रसामध्ये भरपूर मॅग्नेशिअम, कॅलशियम, पोटॅशिअम आणि लोह असते.
२. शीत गुणधर्म
कोरफडीचा रस हा गुणधर्माने शीत असतो. रोज सकाळी हा रस सेवन केल्याने दिवसभर आपले पोट आणि पचनसंथा शांत राहते. आपल्या शरीरातील दाह आणि जळजळ कमी होण्यास मदत होते. उन्हाळ्यातर हा रस अत्यंत उपयोगी.
३. सांध्यांच्या दुखण्यासाठी
ज्या व्यक्तींना गुडघ्यांचे किंवा सांध्यांचे दुखणे असते त्यांनी हा रस रोज घ्यावा. स्नायूंच्या दुखण्यावरही हा रस मात करतो.
४. कोलेस्ट्रॉल ची योग्य मात्रा राखण्यास मदत
कोरफडीच्या रसामध्ये शीत गुणधर्म आढळतात त्यामुळे ते तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल ची मात्रा कमी करते. त्याचबरोबर ढोबळमानाने तुमचे संपूर्ण शरीर निरोगी राहण्यास मदत होते .
५. वजन कमी करण्यास उपयोगी
तुम्हाला माहिती आहे का कोरफडीचा रस वजन कमी करण्यासही मदत करतो. रोजच्या सेवनाने तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते आणि चयापचय क्रिया सुरळीत होते .
६. स्वच्छता
कोरफडीच्या सेवनाने तोंडाची स्वच्छता राखली जाते त्यामुळे घश्याच्या आजारापासून मुक्ती मिळते.
७. मधुमेहावर उपयोगी
तुम्ही जर कोरफडीचा रस रोज सेवन केला तर तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते .
८. पचन संस्था सुरळीत करते
रोज सकाळी कोरफडीचा रस सेवन केल्याने पचन संस्था स्वच्छ होते आणि दिवसभर पचन संस्था सुरळीत काम करते.
९. डोळ्यांचे सौंदर्य वाढवते
एका ग्लास पाण्यामध्ये थोडा कोरफडीचा रस टाका आणि सकाळी ह्या पाण्याने डोळे स्वच्छ धुवा. डोळे स्वच्छ ठेवण्याचा हा नैसर्गिक उपाय आहे .
१०. सर्दी आणि खोकल्यापासून बचाव करते
हिवाळा आला कि अथवा ऋतू बदलला कि सर्दी खोकला होणे हे अगदी साहजिकच आहे .पण आपणच आपली काळजी घेऊन हा रस सेवन करायची सवय लावून घेतली तर सर्दी आणि खोकला दूर पळून जाईल.
तर चला मग आता कृतीकडे वळूया, एव्हढे सगळे फायदे बघून तुम्हालाहि उत्साह आला असेल नाही का ?
कोरफडीचे एक पान घ्या, त्याला मधून एक छेद करा आरपार नाही, चमच्याने रस काढून घ्या, एक कप पाणी मिसळून मिक्सर मध्ये एकजीव करून घ्या. रस तयार. ज्या कोरफडीचे पान वापरात आहात ती विषारी आहे कि बिनविषारी आहे तपासून बघा. कारण कोरफडीच्या भरपूर प्रजाती आहेत आणि सगळ्याच खाण्यास योग्य नाहीत.
ऍलर्जी असल्यास हा रस टाळावा .